चिपळूण रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस पार्किंग व्यवस्था करा!

प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

चिपळूण : चिपळूण रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. रेल्वे स्थानकाच्या या बाजूला शहरालगतचा परिसर असून, पार्किंगची सुविधा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

रेल्वे गाडी स्थानकात आल्यानंतर प्रवाशांना आणण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच स्वतःची वाहने घेऊन येणाऱ्या प्रवाशांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे या परिसरात वाहने उभी करण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

रेल्वे स्थानकाच्या लगत रेल्वेची मोकळी जागा उपलब्ध आहे. या जागेवर भराव टाकून दुचाकी, चारचाकी वाहने तसेच प्रवाशांच्या एसटी बससाठी पार्किंगची व्यवस्था करता येऊ शकते. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल.

रेल्वे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन पार्किंगचा प्रश्न मार्गी लावावा आणि प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button