
जिल्ह्यातील तिघे वेगवेगळ्या कालावधीत बेपत्ता; माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. २६ ): जिल्ह्यातील कल्पना नरेश बिश्वकर्मा, विनोद सखाराम आयरे आणि रेंटा हांसदा या तीन व्यक्ती वेगवेगळ्या कालावधीत आपापल्या परिसरातून बेपत्ता झाल्या आहेत. या व्यक्तींबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा त्या आढळून आल्यास तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बेपत्ता व्यक्तींचा तपशील आणि वर्णनाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
१. कल्पना नरेश बिश्वकर्मा
- पत्ता: गॅलेक्सी अपार्टमेंट, रत्नागिरी (वय ४० वर्षे)
- घटना: १९ जून २०२४ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता.
- वर्णन: उंची ५ फूट ५ इंच, रंग गोरा, बांधा मजबूत, डोळे काळे, केस लांब व काळे.
- ओळख व वेशभूषा: साडी व ब्लाऊज परिधान केलेले. गळ्यात मंगळसूत्र आणि नाकात सोन्याची पुली आहे. बेपत्ता होताना त्यांच्याजवळ ५० हजार रुपये रोख रक्कम होती.
२. विनोद सखाराम आयरे - पत्ता: वालोपे देऊळवाडी, ता. चिपळूण (वय ४७ वर्षे)
- घटना: ११ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजता राहत्या घरातून बेपत्ता.
- वर्णन: उंची ५ फूट, रंग सावळा, बांधा मजबूत, चेहरा उभट, सरळ नाक व काळे डोळे. डोक्याच्या पुढील बाजूस साधारण टक्कल आहे.
- ओळख व वेशभूषा: अंगात चॉकलेटी रंगाचा फुल शर्ट व निळी पँट. त्यांना वारंवार तंबाखू खाण्याची सवय आहे. ते मोबाईल फोन वापरत नाहीत तसेच त्यांच्याकडे कोणतीही मौल्यवान वस्तू नव्हती.
३. रेंटा हांसदा - पत्ता: सध्या रा. पेढे, ता. चिपळूण (मूळ गाव: फतेपूर कालीतला, ठाणे: होईंगाथा, जि. नोदिया, पश्चिम बंगाल) (वय ३६ वर्षे)
- घटना: १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पेढे येथील महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणाहून बेपत्ता.
- वर्णन: उंची ५ फूट ६ इंच, रंग सावळा, बांधा सडपातळ, केस काळे व कुरळे, डोळे काळे. पायात स्लिपर.
- विशेष खूण: उजव्या हाताच्या करंगळीजवळील बोटावर जुन्या शस्त्रक्रियेची खूण असून ते बोट थोडे वाकडे आहे.
नागरिकांना या तिघांपैकी कोणाविषयीही माहिती आढळल्यास अथवा सुगावा लागल्यास त्वरित स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



