
हार्ट अटॅक आयुष्यभर लांब राहील फक्त ‘हे’ २ मासे खा; हृदयरोग टाळण्यासाठी आहे उत्तम उपाय..
Heart attack prevent food : हृदय कायम सक्षम ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात, ज्यामध्ये माशांचा समावेश आहे.
विशेषतः माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. हे पोषक तत्त्व हृदयाचे ठोके सामान्य ठेवण्यास आणि रक्तातील ट्रायग्लिसराईडची पातळी कमी करण्यास मदत करते. सॅल्मन, मॅकरेल व सार्डिन हे अशा माशांपैकी आहेत, ज्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
आठवड्यातून दोनदा माशांचे सेवन केल्याने माणसाचे आयुष्य किमान दोन वर्षांनी वाढते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.ज्या व्यक्तींच्या रक्तात ओमेगा तीन मेदाम्लांचे प्रमाण जास्त असते, त्यांची मृत्यूची शक्यता २७ टक्क्य़ांनी कमी होते; तर हृदयविकाराने त्यांना मृत्यू येण्याची शक्यता ३५ टक्क्य़ांनी कमी होते. ही मेदाम्ले मासे व सागरी अन्नपदार्थात आढळून येतात. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ व युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन या दोन संस्थांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, थोडे जास्त वय असलेल्या ज्या प्रौढांमध्ये रक्तातील ओमेगा-३ मेदाम्लांचे प्रमाण अधिक होते, त्यांचे आयुष्य हेच प्रमाण ज्यांच्यात कमी होते, त्यांच्या तुलनेत २.२ वर्षांनी अधिक होते. या संशोधनाचे प्रमुख लेखक दारिश मोझाफॅरिन यांनी सांगितले की, हृदयाच्या आरोग्यात ओमेगा-३ मेदाम्लांच्या प्रमाणाचे बरेच महत्त्व असल्याचे आमच्या संशोधनात दिसून आले असून, त्यामुळे आयुष्य वाढते.
सॅल्मन आणि बांगडा खाण्याचे फायदे
सॅल्मन व ऑयस्टर हे ओमेगा-३ फॅटी ॲसिडने समृद्ध असलेले मासे आहेत. त्यांमध्ये असलेले EPA आणि DHA हे पोषक घटक शरीरासाठी आवश्यक आहेत. ते हृदयाचे आरोग्य राखण्यास आणि रक्तातील ट्रायग्लिसराईडची पातळी कमी करण्यास मदत करतात. ओमेगा-३ हे फॅटी ॲसिड शरीरातील दाह कमी करण्यातही भूमिका बजावते. संतुलित आहाराचा भाग म्हणून या माशांचे नियमित सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते.
सार्डिन हृदयासाठीही फायदेशीर – माशांसंबंधित लेख असल्याने उपशीर्षकात वारंवार मासा या शब्दाची गरज नाही.
सार्डिन हा एक लहान, तेलकट मासा असून, तो ओमेगा-३ फॅटी ॲसिडचा चांगला स्रोत मानला जातो. त्यात प्रथिने आणि व्हिटॅमिन बी१२ सारखी पोषक तत्त्वेदेखील असतात. त्याचे सेवन केल्याने आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. मासे तेलात तळण्याऐवजी, ते ग्रील करणे, वाफवणे किंवा कमी तेलात शिजवणे उत्तम ठरते. त्यामुळे तुमच्या आहारातील अतिरिक्त तेल आणि कॅलरीज मर्यादित ठेवण्यास मदत होते.
तुम्ही आठवड्यातून किती वेळा मासे खावेत?
अमेरिकन हार्ट असोसिएशन हृदयाच्या आरोग्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा मासे खाण्याची शिफारस करते. शिजवलेल्या माशांचे एक सामान्य प्रमाण सुमारे ३ औंस (८५ ग्रॅम) असते. मासे निवडताना, त्यातील पाऱ्याच्या प्रमाणाचा विचार करणे महत्त्वाचे आहे. कमी पारा असलेल्या माशांना प्राधान्य देणे उत्तम. तसेच, हिरव्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि इतर पौष्टिक पदार्थांसोबत संतुलित आहाराचा भाग म्हणून माशांचा समावेश करा.
मासे खाल्ल्याने तुमच्या हृदयाला फायदा होऊ शकतो; पण त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका पूर्णपणे नाहीसा होत नाही. हृदय सक्षम राखण्यासाठी संतुलित आहारासोबतच नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि वजन नियंत्रण या बाबीदेखील महत्त्वाच्या ठरतात.




