धुम्रपान आणि तंबाखूजन्य शहरात पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई


धुम्रपान आणि तंबाखूजन्य शहरात पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करीत नियम मोडणार्‍या टपरीधारकांचे चांगलेच कान उपटले आहेत. सार्वजनिक ठिकाणचे आरोग्य जपण्यासाठी आणि तरुणांना तंबाखूच्या विळख्यातून वाचविण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय भरारी पथकाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी शहर परिसरात अचानक छापे मारले.
या धडक मोहिमेदरम्यान सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा म्हणजेच कोटपा २००३ च्या विविध कलमांचे उल्लंघन करणार्‍या १६ टपरीधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत एकूण २,९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेचा मुख्य उद्देश सार्वजनिक ठिकाणी होणारे धूम्रपान रोखणे, तंबाखूची बेकायदेशीर जाहिरात थांबविणे, १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना तंबाखू विक्री रोखणे आणि शाळा-महाविद्यालयांच्या १०० यार्ड परिसरात चालणारी तंबाखू विक्री बंद करणे हा होता.
या विशेष पथकात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत, सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे, अनिल गुंजे तसेच शहर पोलीस आणि होमगार्डच्या कर्मचार्‍यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button