
रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथे उंदीर मारण्याचा विषारी पदार्थ सेवनाने महिलेचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथे कौटुंबिक वादातून उंदीर मारण्याचा विषारी पदार्थ खाल्ल्याने महिलेचा मृत्यू झाला. मथुरा मनोज मेस्त्री (३१, रा. सुतारवाडी, शिवार आंबेरे) असे मृत महिलेचे नाव आहे. मधुरा हिने ४ ऑक्टोबर रोजी पत्तीशी झालेल्या वादातून उंदिर मारण्याचा विषारी पदार्थ खाल्ला होता. यावेळी तिला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. यानंतर पुढील उपचारासाठी तिला मुंबई येथे नेण्यात आले. १० ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे.



