
जयगड नळपाणी योजनेवरील१४ कर्मचार्यांकडे दुर्लक्ष, कामगारांचं जि.प.समोर ठिय्या आंदोलन
जयगड नळपाणी योजनेवर १४ कर्मचारी रात्रंदिवस राबत असूनही प्रशासनाच्या दप्तरी त्यांची कोणतीही अधिकृत हजेरी, मस्टर किंवा कामाची नोंदच उपलब्ध नाही. मध्यरात्री जंगलसदृश भागात असलेल्या पाण्याच्या टाक्यांवर आणि हाय-व्होल्टेज विद्युत वाहिन्यांच्या धोक्यात जीवाची बाजी लावून काम करावे लागते, मात्र या कर्मचार्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही. आरोग्य विमाही नाही. पेट्रोलचे दर गगनाला भिडले असताना अत्यंत दूर अंतरावर असलेल्या गावांमध्ये काम करण्यासाठी कंत्राटदाराकडून कोणताही प्रवास भत्ता दिला जात नसल्याने हे आंदोलन हाती घेण्यात आले.
www.konkantoday.com




