सेवाशक्ती संघर्ष संघटना रत्नागिरी विभाग यांची विभाग नियंत्रक श्री अश्वदीप जानराव साहेब सोबत बैठक संपन्न..!
रत्नागिरी : सेवाशक्ती संघर्ष संघटना रत्नागिरी विभाग यांची विभाग नियंत्रक श्री अश्वदीप जानराव साहेब यांच्या सोबत बैठक पार पडली. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष श्री संतोषजी बोरकर साहेब, उपाध्यक्ष श्री संजीव बने साहेब, सचिव श्री वसंत कांबळे, श्री निलेश आखाडे साहेब व अन्य आगार पदाधिकारी उपस्थित होते. ही बैठक चार ऑगस्ट रोजी संपन्न झाली. चालक वाहक कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा विषय म्हणजे ड्युटी अलोकेशन, राजापूर लांजा गुहागर खेड मंडणगड आगारा मध्ये वेळेवर ड्युटी अलोकेशन लावले जात नाही रात्री ०८.०० नंतर व्हाट्सअप वर टाकले जाते बरेच कर्मचारी ग्रामीण भागात राहत असल्याने मोबाईल रेंज नसते त्यामुळे आपली उद्याची ड्युटी काय आहे या संभ्रमात असतात त्यामुळे ड्युटी बाबत बरेच वाद निर्माण होतात. विभाग नियंत्रक साहेबांनी हे अलोकेशन दुपारी १२.०० वाजता लावण्यात येईल याचे आश्वासन दिले त्याचप्रमाणे ओव्हर टाईम बाबत चर्चा झाली यामध्ये जादा बेसिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ड्युटीला वापरले जातात त्यामुळे महामंडळाचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले जाते हे संघटना पदाधिकाऱ्याने पटवून दिले.
त्याचप्रमाणे कामगार तक्रारीबाबत प्रामुख्याने राजापूर आगाराचे चालक श्री तेजस रायबागकर यांच्यावर झालेली कारवाई दप्तरी जमा होऊन देखील पाच दिवसाचे वेतन दिले नाही. व श्रीम. अपूर्वा कदम, श्री संदेश पवार, श्री मनोज बारस्कर या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीबाबत चर्चा करण्यात आली. विभाग नियंत्रक साहेबांनी सर्व तक्रारी समजून घेऊन तक्रारींची चौकशी करून न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले . काही यांत्रिक कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने बढती देण्यात आलेले आहे व जबाबदार यांत्रिक कर्मचाऱ्यांकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे. परंतु वाहन चालवता येत नाही अशा यांत्रिक कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली गेली यंत्र अभियंता मार्फत चौकशी केली जाईल असा खुलासा करण्यात आला. या बैठकीमध्ये चर्चा झालेली विविध प्रश्न तातडीने सोडवले जातील असे आश्वासन उपस्थित पदाधिकारी यांना देण्यात आले. व मागील दोन महिन्यापासून देण्यात आलेले निवेदने यावरती सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने सेवाशक्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. विभाग नियंत्रक श्री अश्वदीप जानराव यांचे आभार मानले.




