
जेन झी” साठी ठाकरे युवा सेनेचा पुढाकार : रत्नागिरीतील 5 तालुक्यांसाठी सुरू झाली “आदित्य युवा हेल्पलाईन”. जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा पुढाकार
रत्नागिरी: युवांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना तातडीची मदत मिळावी या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेकडून रत्नागिरीत “आदित्य युवा हेल्पलाईन” सुरू करण्यात आली आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाने जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या पुढाकाराने ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
शिवसेना तालुका समन्वयक शेखर घोसाळे आणि शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ही सेवा रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या 5 तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
कोणत्या समस्यांसाठी संपर्क करता येईल?
हेल्पलाईनच्या माध्यमातून युवकांना खालील समस्यांसाठी मदत मिळणार आहे:
- रोजगार – नोकरीच्या ठिकाणी असलेल्या समस्या
- शिक्षण – शालेय, महाविद्यालयीन आणि पायाभूत सुविधांच्या अडचणी, उच्च शिक्षणासाठी पर्याय
- वाहतूक – एसटी बस आणि परिवहन संबंधित इतर समस्या
- प्रशासन – दाखले, प्रमाणपत्रे मिळवण्यात होणारी दिरंगाई आणि प्रशासकीय अडथळे
- तांत्रिक समस्या – डोंगराळ भागात इंटरनेट आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या
- आपत्ती व्यवस्थापन – विशेषतः चिपळूण मधील पूर परिस्थिती सारख्या आपत्कालीन परिस्थितीत मदत
- आरोग्य – आरोग्य सुविधांमधील कमतरता
संपर्क क्रमांक
युवा सेने प्रत्येक तालुक्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत.
- रत्नागिरी: संदेश नारगुडे – 7020127980, ओंकार कोरेकर – 7378707909, आशिष चव्हाण – 9175353635
- चिपळूण: प्रितम वंजारे – 7038840385, पार्थ जागुष्टे – 7447774442
- संगमेश्वर: अमर गवाणकर – 9421136707
- लांजा: अभिजित राजेशिर्के – 8888259725
- राजापूर: संतोष हातणकर – 7620676731, सुभाष नवाळे – 9420843958
याशिवाय जिल्हाप्रमुख प्रसाद सुरेश सावंत यांच्याशी 9112056156 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
या उपक्रमामुळे युवकांच्या समस्या तातडीने प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यास मदत होणार असल्याचे युवा सेनेकडून सांगण्यात आले आहे. यावेळी युवासेना पदाधिकारी उपस्थीत होते.



