रत्नागिरीतील सुवर्णकार सागर उर्फ पिंट्या नार्वेकर यांचे दुःखद निधन


रत्नागिरीतील प्रसिद्ध सुवर्णकार सागर उर्फ पिंट्या शरद नार्वेकर यांचे कोल्हापूरात रात्री दुःखद निधन झाले. दरम्यान शुक्रवारी त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु होते. काल रात्री त्यांचे दुःखद निधन झाले.

सागर नार्वेकर हे मनसेचे कार्यकर्ते होते. सध्या ते दापोली अर्बन बँकेत सोनाराचे पॅनेलवर काम करीत होते. अत्यंत चांगला हसतमुख व्यक्तिमत्व असलेले सागर यांचे वयाच्या ५० व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले सागर नार्वेकर यांच्या अचानक जाण्याने मित्र परिवारात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. आज दुपारी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button