
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे दुचाकी दिली नाही म्हणून तरुणाला मारहाण
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे दुचाकी न दिल्याच्या रागातून तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष भाजू राठोड (४१, रा. रहाटाघर रत्नागिरी) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार मारहाण प्रकरणी दीपक राठोड याच्यावर रत्नागिरी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दीपक राठोड याने संतोष यांच्याजवळ दुचाकी मागितली होती. यावेळी दुचाकी देण्यास नकार दिल्याच्या रागातून दीपक याने संतोष यांना काठीने मारहाण केली अशी नोंद रत्नागिरी शहर पोलिसात करण्यात आली आहे.




