कासवांच्या विणीचा हंगाम यंदा अपेक्षेपेक्षा लवकर सुरू, गुहागरच्या समुद्रकिनार्‍यावर आढळले ऑलिव्ह रिडले पहिले घरटे


कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांच्या विणीचा हंगाम यंदा अपेक्षेपेक्षा दोन ते तीन महिने आधीच सुरू झाला असून गुहागरच्या समुद्रकिनार्‍यावर ७ ऑक्टोबर रोजी या हंगामातील पहिले घरटे आढळून आले आहे. साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च दरम्यान सुरू होणारा हा वीण काळ गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने जानेवारी ते मार्च या कालावधीत केंद्रित झाल्याचे दिसून आले होते. मात्र यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच पहिले घरते सापडल्याने सागरी पर्यावरणातील बदलांचे हे संकत आहेत का, यावर आता पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या मादी कासवांचे अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आगमन होते. वन विभागाच्या कादळवन कक्षाकडील नोंदीनुसार रायगडमधील चार, सिंधुदुर्गातील सुमारे वीस आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे तीस किनार्‍यांवर ही वीण प्रक्रिया चालते. यामध्ये गुहागरचा सहा किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण किनारा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक घरट्यांची नौद होणारा किनारा म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी तब्बल १४५ घरट्यांची नोंद झालेल्या याचं ऐतिहासिक किनार्‍यावर यंदाच्या मोसमातील पहिल्या घरट्याची यशस्वी नोंद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button