आजीच्या निधनानंतरही अभिजीत दिपकेंचा घरी जाण्यास नकार; दिल्ली पोलिसांचा खळबळजनक खुलासा, थेट Video शेअर केला शेअर


दिल्ली पोलिसांनी रविवारी एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी कोक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांना त्यांच्या आजीच्या निधनाची माहिती देताना दिसत आहेत.
राजधानी दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांना ही माहिती देण्यात आली होती.

पोलिसांनी सांगितले की, दिपके यांना त्यांच्या आजीच्या निधनाची तसेच अंत्यसंस्काराच्या वेळेची माहिती देण्यात आली होती. अंत्यसंस्कारासाठी महाराष्ट्रातील त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मदत करण्याची तयारीही पोलिसांनी दर्शवली होती. पोलीस उपायुक्त नेहा यादव यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी विमान प्रवास, फोन कॉल आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्यासाठीही मदतीची ऑफर दिली होती.

यादव यांच्या म्हणण्यानुसार, दिपके यांच्या आजीच्या निधनाची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिपके यांना वारंवार विचारले की, त्यांना त्यांच्या आई-वडिलांशी बोलायचे आहे का? मात्र दिपके यांनी पोलिसांनी दिलेली मदत नाकारल्याचे त्यांनी सांगितले.

नेहा यादव म्हणाल्या, कोक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आजीचे निधन झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळताच अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून ही दुःखद बातमी दिली आणि शक्य ती सर्व मदत देऊ केली. विमान प्रवास, फोन कॉल किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी मदत हवी आहे का, याबाबत त्यांनी संवेदनशीलतेने विचारणा केली. त्यांना आई-वडिलांशी बोलायचे आहे का, असेही वारंवार विचारण्यात आले. मात्र त्यांनी ही मदत नाकारली.

दिपके यांच्या आईच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांचे उत्तर .

अभिजीत दिपके यांच्या आई अनिता दिपके यांनी पोलिसांवर आरोप केले होते की, त्यांच्या मुलाला आजीच्या निधनाची माहिती दिली होती की नाही, याबाबत पोलिसांनी चुकीची माहिती दिली. कुटुंबीयांना अभिजीत यांच्याशी संपर्क साधता येत नव्हता. ते परत येतील या अपेक्षेने कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारही पुढे ढकलले होते, असे त्यांनी सांगितले.

मात्र दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना त्यांच्या आजीच्या निधनाची आणि अंत्यसंस्काराच्या नियोजित वेळेची माहिती दिल्याचा दावा कायम ठेवला. तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना घरी जाण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवण्यात आली होती, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button