सेवा संकल्प अभियानांतर्गत सॅम-मॅम व दुर्धर आजारग्रस्त बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर


रत्नागिरी : माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुमरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली वालावलकर हॉस्पिटल, डेरवण व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), तालुका रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत आज दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी DEIC विभाग, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे लड्डू गोपाल योजनेंतर्गत सॅम-मॅम तसेच दुर्धर आजार असलेल्या बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
या शिबिरास रत्नागिरी तालुक्यातील एकूण ४८ बालके उपस्थित होती. त्यामध्ये ३ सॅम, ४२ मॅम, १ SUW व २ इतर आजाराची बालके होती. बालकांची तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले. तसेच बालकांचे वजन वाढण्यास मदत व्हावी यासाठी ४५ बालकांना पौष्टिक लाडूंचे वाटप करण्यात आले. उपस्थित पालकांना आहारतज्ज्ञांमार्फत योग्य आहार व बालकांच्या पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरासाठी वालावलकर हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. शर्वरी गमे व डॉ. श्रावणी गोसावी, तसेच DEIC विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत कांबळे उपस्थित होते. याशिवाय RBSK वैद्यकीय अधिकारी, आरोग्य परिचारिका, औषध निर्माण अधिकारी, DEIC विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ICDS विभागाच्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच पालकवर्ग यांनी सक्रिय सहभाग घेतला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व पंचायत समिती रत्नागिरीचे अधिकारी-कर्मचारी तसेच सर्व संबंधित विभागांचे मोलाचे सहकार्य लाभले.
बालकांच्या आरोग्य व पोषणासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल सर्व सहभागी अधिकारी, कर्मचारी, तज्ज्ञ, अंगणवाडी सेविका व पालकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button