पत्रकार बाळासाहेब पाटणकर यांच्या पत्नी सौ. हुस्नआरा पाटणकर यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळामुळे निधन


समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते व कोकणातील एक नामवंत पत्रकार श्री. बाळासाहेब पाटणकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. हुस्नआरा पाटणकर यांचे आज गुरुवारी पहाटे वृद्धापकाळामुळे निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय सुमारे ८८ इतके होते. सौ. हुस्नआरा पाटणकर यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून वृद्धापकाळातील आजारपणामुळे काहीशी नरमगरम होती. त्यांचेवर वैद्यकीय उपचार सुरु होते. परंतु आज सकाळी त्यांची प्रकृती वैद्यकीय उपचारांना साथ देईनाशी झाली व त्यांचे देहावसान झाले. .त्यांचे पती श्री. बाळासाहेब पाटणकर हे महाराष्ट्र प्रदेश समाजवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांचा नेहमी अखिल भारतीय स्तरावरील नेत्यांमध्ये वावर असे, त्यामुळे बॅ. नाथ पै, माजी खासदार मधु दंडवते, प्रमिला दंडवते, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे अशा मोठ्या नेत्यांची त्यांच्या घरी सदैव ये-जा असे. हुस्नआरा पाटणकर त्या सर्वांचे सदैव हसतमुखाने आदरातिथ्य करीत. त्यांच्या मागे त्यांचे पती श्री. बाळासाहेब पाटणकर व मुलगा श्री. अतिफ पाटणकर, सून सौ. नेहा पाटणकर व नातू असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button