
समुद्रकिनारी अल्पवयीनांसाठी ’जीवरक्षक’ सक्ती करा, चिपळूणच्या नगरसेविका अंजली कदम यांची मागणी
कोकणातील समुद्रकिन्ग्रयांवर पर्यटनासाठी येण्प्रया अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिवेआगार समुद्रकिन्ग्रयावर आठ मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर अठरा वर्षांखालील मुलांना जीवरक्षकाच्या सोबतीशिवाय समुद्रकिनारी जाण्यास बंदी घालावी, अशी मागणी नगरपरिषद बाल संरक्षण समितीच्या अध्यक्षा तथा येथील नगरसेविका अंजली कदम यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे, कोकण पर्यटनाच्या दृष्टीने वेगाने विकसित होत असताना पर्यटकांच्या सुरक्षिततेलाही, तितकेच प्राधान्य देणे आवश्यक आहे.
विशेषतः समुद्राची खोली, पाण्याची पातळी. प्रवाह तसेच समुद्रकिनार्याची भौगोलिक रचना याबाबत बाहेरून येणया पर्यटकांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकदा दुर्घटना घडतात. दिवेआगार येथील आठ मुलांच्या बुडण्याच्या घटनेने या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने समुद्रकिन्द्रयांवर विशेष सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.




