
रेल्वे रुळानजीक अज्ञाताचा मृतदेह
कोकण रेल्वे मार्गावरील कोंडिवली रेल्वे रुळानजीक बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. रेल्वेतून पडल्यामुळे किंवा रेल्वे रुळ ओलांडताना त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत माहिती मिळताच कोकण रेल्वे सुरक्षा दलासह स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.




