देव, घैसास, कीर महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात इतिहास विभाग, एन.एस.एस. आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. जयंती कार्यक्रमानिमित्त महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

दूर्वा टिळेकर हिने लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. प्राची जोशी हिने महात्मा गांधी यांच्या कार्याचा आढावा घेतला. राष्ट्रीय सेवा योजना आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता सप्ताह – २०२६ अंतर्गत स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर घोषवाक्य स्पर्धा नाटेकर हॉलमध्ये पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिवानी पाटील, द्वितीय प्रियंका नेवरेकर, तृतीय दीक्षा आंब्रे यांनी यश मिळवले.

प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख रिया बंडबे यांनी केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपप्राचार्या वसुंधरा जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. विनय बावदाने, वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. राखी साळगावकर, एन.एस.एस. विभागप्रमुख प्रा. मिथिला वाडेकर, प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वरांगी विचारे हिने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button