
रत्नागिरी नगर राजभाषा कार्यान्वयन समितीची गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम.
नगर राजभाषा राजभाषा कार्यान्वयन समितिच्या अंतर्गत बैंक ऑफ इंडिया,विभागीय कार्यालय द्वारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरी शहरात गेली 22 वर्षे हिंदी राजभाषाच्या प्रचार प्रसार करिता कार्यरत असणारी नगर राजभाषा कार्यान्वयन समिती हिन्दी भाषेच्या प्रचार प्रसार बरोबरच आपले सामजिक दायित्व ही पार पाडीत आहे.
आज मोठ्या संख्येने सरकारी कार्यालयातील, बँक, विमा कर्मचारी अधिकारी यांनी भाटे बीच वर स्वच्छता करण्याकरिता हजेरी लावली. सदर स्वच्छता मोहीम झरी विनायक मदिर ते उत्तरेकडे 1 किलोमिटर पेक्षा जास्त किनार पट्टी साफ केली. प्लास्टिक, काचांची बाटल्या व अन्य कचरा बॅगा भरून समुद्र किनारी एकत्र केला.
या मोहिमेत बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय तट रक्षक वायु awअवस्थान, कोस्ट गार्ड, दीप स्तंभ, बीएसएनएल, सेंट्रल बँक , इंडियन बॅंक, यूको बैंक, अग्रणी जिला कार्यालय, आईओबी, बैंक ऑफ बडोदा, कोंकण रेल्वे, डाक कार्यालय, केनरा बॅंक, पंजाब अँड सिंध बैंक, यूनियन बँक,आयकर, कस्टम, जीएसटी कार्यालय तसेच सर्व विमा कंपनी, या मोहिमेत सहभागी झाले होते.
समिती द्वारा कार्यालयात हिन्दीचा प्रयोग वृद्धिसाठी प्रयत्न केले जातात.
हिन्दी कार्यशाळा, हिन्दी दिवस, विश्व हिंदी दिवस, कवि सम्मेलन याचबरोबर समिती आपले सामजिक दायित्व ही पार पाडत आहे. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, 15 ऑगस्ट ला हर घर तिरंगा रॅली काढण्यात येते. कार्यालय अंतर्गत स्टाफ सदस्या करिता खेळाचे ही आयोजन केले जाते.
समितीचे 31 सरकारी सदस्य कार्यालय आहेत.
सदर समिती च्या कार्याची जबाबदारी बॅंक ऑफ इंडिया च्या विभागीय कार्यालयावर सोपवली आहे.
समितीची अध्यक्ष पदाची जबाबदारी विभागीय प्रमुख श्री नरेंद्र रघुनाथ देवरे व सदस्य सचिव श्री रमेश गायकवाड सांभाळत आहेत.




