नियोजन बैठकीपेक्षा योगेश कदम आणि सुनील तटकरे आले समोरासमोर,’ नजर चुकी चीच चर्चा रंगली


जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने आज रत्नागिरीत दियाज नेत्यांची मांदियाळी जमली असतानाच, शासकीय विश्रामगृहावर मात्र एका वेगळ्याच राजकीय नाटकाचा प्रयोग पाहायला मिळाला. शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनिल तटकरे अचानक एकमेकांसमोर आले. मात्र, ऐन टप्प्यावर समोरासमोर येऊनही औपचारिकता दाखवणे तर दूरच, दोघांनीही सोयीस्करपणे नजरा चुकवित पाठ फिरविणे पसंत केले. माजी मंत्री रामदास कदम आणि सुनिल तटकरे यांच्यातील जुन्यो राजकीय वैराचे पडसाद या ’कोल्ड वॉर’च्या रूपाने पुन्हा उमटल्याचे दिसून आले.
खासदार सुनिल तटकरे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, विधान परिषद आमदार निरंजन डावखरे आणि अनिकेत तटकरे या सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. बैठकीपूर्वी सर्व मंत्र्यांचा व आमदारांचा मुक्काम नेहमीप्रमाणे शासकीय विश्रामगृहावरच होता. सकाळी बैठकीला निघताना खासदार सुनिल तटकरे, खासदार नारायण राणे आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे एकत्रच सभागृहाच्या दिशेने रवाना होत होते. त्याच वेळी समोरून मंत्री योगेश कदम आले आणि ते उदय सामंत यांच्याशी बोलू लागले. याच दरम्यान तटकरे पुढे आले असता, योगेश कदम आणि सुनिल तटकरे अगदी एकमेकांच्या जवळून गेले. परंतु, एकमेकांकडे पाहाण्याचे साधे धाडस किंवा औपचारिकता न दाखविता दोघांनीही लगेच मान वळवली रामदास कदम आणि तटकरे यांच्यातील राजकीय वितुष्ट सर्वश्रुत असल्याने, या प्रसंगाने त्या जुन्या संघर्षाला पुन्हा उजाळा दिला. दिवसभरात जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा ठरविणार्‍या बैठकीपेक्षा शासकीय विश्रामगृहावर घडलेला हा नजर चुकीचा प्रकारच राजकीय वर्तुळात चटपटीत चर्चेचा मुख्य विषय बनला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button