गणेशोत्सव स्पर्धेतून नवे शिल्पकार अन् नेपथ्यकार घडले पाहिजेत पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा व रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पारितोषिक वितरण उत्साहात

रत्नागिरी
गणेशोत्सव सजावट स्पर्धेकडे केवळ एक पारंपरिक स्पर्धा म्हणून न बघता, या उपक्रमातून भविष्यात उत्तम दर्जाचे व्यावसायिक कलाकार, शिल्पकार आणि नेपथ्यकार निर्माण झाले पाहिजेत, असे प्रतिपादन उद्योग व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

कांचन डिजिटल आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
रत्नागिरीत कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा पारितोषिक वितरण आयोजित दिमाखदार सोहळ्याला राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण तथा भैया सामंत, श्री भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना शेठ सुर्वे, नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, न.प.समाजकल्याण सभापती विजय खेडकर, ज्येष्ठ उद्योजक प्रसन्न शेठ आंबुलकर, मुकेश गुंदेचा, गणेश धुरी, गौरांग आगाशे, ओंकार रहाटे, सौ. रक्षा घाग, सिद्धिविनायक हॉल चे वल्लभ केटरर्स, कामगार नेते सुनील साळवी, स्पर्धेचे संयोजक कांचन मालगुंडकर, मंथन मालगुंडकर, यांच्यासह परीक्षक, स्पर्धक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देत पालकमंत्री सामंत म्हणाले की, लहानपणी पाली येथे राहताना आवंतकर कुटुंबाची गणेशमूर्ती कार्यशाळा जवळून अनुभवली. साच्याचा वापर न करता केवळ हाताने अत्यंत सुबक गणेशमूर्ती तयार करण्याचे कौशल्य कोकणातील कारागिरांकडे आहे. पेण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बनणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींना जगभरात मोठी मागणी आहे. दिल्लीतही रत्नागिरीत तयार झालेल्या शेकडो हस्तनिर्मित मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असतात, यावरून आपल्या भागातील कलाकारांच्या कौशल्याची प्रचिती येते.
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील ग्रामीण भागातील कलाकारांचे उदाहरण देत त्यांनी स्पष्ट केले की, मुलांमधील कलागुण ओळखून पालकांनी त्यांना योग्य प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. आजच्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट आणि सजावट (नेपथ्य) या क्षेत्रात रोजगाराच्या आणि प्रगतीच्या अफाट संधी उपलब्ध आहेत. हातामध्ये खरी कला असेल, तर कोणत्याही मध्यस्थाशिवाय कलाकार स्वतःच्या मेहनतीचा पूर्ण मोबदला मिळवू शकतो.
स्पर्धेचे आयोजक कांचन मालगुंडकर यांच्या कल्पकतेचे आणि उपक्रमाचे कौतुक करताना त उदय सामंत यांनी विजेत्या स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांचन मालगुंडकर यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण तथा भैय्या सामंत यांचे या स्पर्धेला भक्कम पाठबळ लाभले आहे. तसेच यंदा या स्पर्धेला रत्नागिरी नगर परिषदेचेही सहकार्य लाभले आहे. नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी या स्पर्धेला नगरपरिषदेचे संपूर्ण सहकार्य तसेच इतर सर्व सहकारी मान्यवरांनी सहकार्य दिल्याचे सांगितले. तर सूत्रसंचालन प्रथमेश साळवी यांनी केले.
या स्पर्धेला सहकार्य करणाऱ्या उद्योजक गौरांग आगाशे , राजूशेठ घाग – संचालक रत्ना. जि. मजूर सह. संस्थारत्नागिरी संघ, विकी जैन – पद्मावती कन्स्ट्रक्शन, अमेय विरकर – अमेय ज्वेलर्स, सौरभ मलुष्टे – नगरसेवक, ओंकार राहाटे – जयेश मंगल कार्यालय, रोहीत विरकर – स्वानंद ज्वेलर्स, विजय खेडेकर – श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्ट, गणेश धुरी – आरती डायनिंग, संतोष रेडीज – संतोष इलेक्ट्रिकल्स, सिद्धीविनायक मंगल कार्यालय – श्री वल्लभ कॅटरर्स  यांनाही सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमात कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेतील” या स्पर्धेत यंदा प्रथमच “चलचित्र” आणि “आरास-सजावट” असे दोन विभाग करण्यात आले होते. या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त चलचित्र विभाग : – प्रथम क्रमांक – संदीप मेस्त्री, सडेवाडी-जयगड
( श्री स्वामी समर्थ्यांचा दिव्य प्रकटावतार ), द्वितीय क्रमांक – मयूर सुरेश भितळे, सोमेश्वर ( हिरकणी देखावा ), तृतीय क्रमांक – दीपक मेस्त्री, मिरजोळे ( भक्त पुंडलिक ). त्याचबरोबर आरास / सजावट विभाग :- प्रथम क्रमांक – अनिकेत सुपल , सह्याद्रीनगर – नाचणे ( बारा ज्योतिर्लिंग ), द्वितीय क्रमांक – स्वप्नील ठिक, तिवंडेवाडी-शिरगाव ( ग्रामीण घर -वारली पेंटिंग ), तृतीय क्रमांक – अजय पारकर, मावळंगे-गजनेवाडी ( दगडावर चित्रकला ). सुबक मूर्तिकार – वैभव लिंगायत ( राजेश लिंगायत यांच्या घरचा गणपती) विशेष उल्लेखनीय* :- चारुदत्त धालवलकर, गावखडी ( संत ज्ञानेश्वरांनी चालवली भिंत ), जीवन कोळवणकर, कुवारबाव (गोकर्ण महाबळेश्वर कथा ), साईराज वाडकर, मिरजोळे ( छ. शिवाजी महाराज -भवानी तलवार ), घाटकर परिवार, शेडगेवाडी -पावस ( अन्नभेसळ समाजप्रबोधन ), उत्तेजनार्थ :-साईराज पोटफोडे, जुनीतांबटआळी-रत्नागिरी ( पुरातन मंदिर ), निखिल साळवी, गावखडी ( सुंभ आरास ), आग्रे परिवार, पावस ( एकविरा माता मंदिर ),संकेत पाटील ( रेडियशन दुष्परिणाम ) यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच
*प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त :- अथर्व सावंत, नाचणे ( बारा ज्योतिर्लिंग ), विशाल शिंदे -सोमेश्वर ( ग्रामीण वारली पेंटिंग ), किशोर जोशी, मिरजोळे ( सीताहरण ), सागर पुसाळकर, निवखोल ( आकर्षक आरास ), ओंकार कांबळे, भाटिमिऱ्या ( रामसेतू ), चैतन्य खेडेकर, बंदररोड ( आकर्षक आरास ),दीक्षा रसाळ, वरचीआळी ( वारली पेंटिंग ), सुरेश सनगरे, परटवणे ( वारली पेंटिंग ), यश आंब्रे, गावडे आंबेरे ( मंदिर देखावा ), आध्या शिर्सेकर, भाट्ये (निसर्ग देखावा ), ओम तोडणकर, कुर्ली ( आकर्षक आरास ), सार्थक मुरकर, फणसोप ( गोकुळधाम )
महेश सुतार ( गावखडी सुतारवाडी ) या सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळेला कांचन डिजिटल चे
बाळकृष्ण चव्हाण, शकील गव्हाणकर, ओंकार पाटणकर, मुकेश गुंदेच्या, अजिंक्य सनगरे, मंथन मालगुंडकर, श्रावणी मालगुंडकर, दीपिका कुबल, साधना मालगुंडकर, मधुरा मालगुंडकर, दीपक वारेकर, वरद वारेकर आणि जयंत मालगुंडकर मंगळागौरीच्या परीक्षक सेजल मयेकर हे उपस्थित होते
त्याचप्रमाणे आयोजित केलेल्या मंगळागौर स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या अनुक्रमे प्रथम तीन संघांमध्ये रंग माळयीला (कलासार्थ) – प्रथम, श्री रामेश्वर कालिका (काळबादेवी) – द्वितीय आणि श्री स्वामी समर्थ (शिरगाव) – तृतीय यांना पारितोषिक आणि सन्माचिन्ह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. आणि आभार प्रदर्शनाने सोहळ्याची सांगता झाली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button