रत्नागिरी स्पेशलचा २७ सप्टेंबरला अंतिम दिवस

खेड : गणेशोत्सवानिमित्त कोकण मार्गावर ११ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या सीएसएमटी–रत्नागिरी गणपती स्पेशलला कोकणवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या विशेष रेल्वेची अंतिम फेरी २७ सप्टेंबर रोजी धावणार आहे.
०११५३/०११५४ क्रमांकाची सीएसएमटी– रत्नागिरी स्पेशल सीएसएमटी स्थानकातून सकाळी ११.३० वाजता सुटते आणि त्याच दिवशी रात्री ८.२५ वाजता रत्नागिरीला पोहोचते. परतीच्या प्रवासात ही गाडी रत्नागिरीहून सायंकाळी ४ वाजता सुटते.
या विशेष गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, कामथे, सावर्डे, आरवली आणि संगमेश्वर येथे थांबे देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी या विशेष गाडीचा मोठा उपयोग झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button