
लंका उद्ध्वस्त केल्यानंतर भारतीय लेकींनी नक्वींचीही पुरती फजिती केली; ट्रॉफी स्विकारण्यास नकार
वुमेन्स आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने दणक्यात विजय मिळवला अन् ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. हरमनप्रीत कौरच्या पोरींनी श्रीलंका टीमचा 72 रनने पराभव करत 8 व्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.मात्र, त्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये भारतीय टीम मैदानात आलीच नाही अन् मोहसिन नक्वीच्या हातून ट्रॉफी स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला. टीम इंडियाने सर्वांसोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला. त्यावर आता बीसीसीआयची भूमिका आता समोर आली आहेड्रेसिंग रूममध्येच BCCI सचिव देवजित सैकिया यांनी नंदिनी शर्माला टीमचा इन-हाउस बेस्ट फिल्डर मेडल प्रदान केला. दुसरीकडे, नक्वी यांनी श्रीलंका टीमला रनर्स-अप मेडल आणि चेक दिला व ट्रॉफी तिथेच सोडून ते स्टेडियममधून निघून गेले. पोस्ट मॅच प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना हेड कोच अमोल मुझुमदार यांनी यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न घेण्याची ही BCCI ची अधिकृत भूमिका आहे. आम्ही भारताचे अधिकृत चॅम्पियन आहोत आणि आमच्यासाठी ट्रॉफी मिळणं किंवा न मिळणं याने काहीही फरक पडत नाहीबीसीसीआयच्या नो हँडशेक पॉलिसीने मोठा वाद पेटला होता. आता बीसीसीआयने मोहसिन नक्वीच्या हातून ट्रॉफी स्विकारण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आता दुबईच्या स्टेडियमवर हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. गेल्या वर्षी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय मेन्स संघाने देखील नक्वी यांच्याकडून मेडल आणि ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. ती ट्रॉफी आजही ACC च्या ऑफिसमध्ये ठेवण्यात आलेली आहे.दरम्यान, राजकीय आणि प्रशासकीय वादांमुळे सलग दुसऱ्या वर्षी आशिया कपची ट्रॉफी विजयानंतरही चॅम्पियन टीमला मिळू शकलेली नाही. त्यामुळे आता मोहसिन नक्वी जेव्हा पायउतार होतील, तेव्हाच आता टीम इंडियाला ट्रॉफी मिळू शकेल.




