✈️ सहा आसनी विमानानंतर आता ‘स्वदेशी UAV’ची भरारी!


कॅप्टन अमोल यादव यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची ना. उदय सामंतांकडून पाहणी; एरोस्पेस क्षेत्रातील नव्या पर्वाची चाहूल


धुळे : सहा आसनी स्वदेशी विमानाच्या यशस्वी निर्मितीनंतर आता कॅप्टन अमोल यादव यांच्या थ्रस्ट एअरक्राफ्ट कंपनीकडून भारतीय बनावटीचे UAV (मानवरहित विमान) विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी धुळे विमानतळावरील कंपनीच्या रिसर्च युनिटला भेट देऊन पाहणी केली.

कॅप्टन अमोल यादव यांच्या नेतृत्वाखाली विकसित होत असलेल्या या स्वदेशी UAV प्रकल्पाच्या प्रगतीची यावेळी ना. सामंत यांनी सविस्तर माहिती घेतली. प्रकल्पाची सद्यस्थिती, तांत्रिक प्रगती तसेच आगामी टप्प्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

“महाराष्ट्रात एरोस्पेस आणि विमाननिर्मिती क्षेत्रातील संशोधन, नवकल्पना आणि स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी अशा महत्त्वपूर्ण उपक्रमांना शासनाचे आवश्यक सहकार्य राहील,” असे ना. उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

सहा आसनी विमानाच्या निर्मितीनंतर आता भारतीय तंत्रज्ञानावर आधारित UAV विकसित करण्याच्या दिशेने थ्रस्ट एअरक्राफ्टने टाकलेले हे पाऊल महाराष्ट्राच्या विमाननिर्मिती आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

यावेळी थ्रस्ट एअरक्राफ्ट कंपनीचे कार्यकारी संचालक रश्मीकांत यादव आणि चीफ इंजिनियर मुनिस्वरन रघुपती उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button