ऑल आऊट ऑपरेशनमध्ये राजापूर पोलिसांची कारवाईतीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; ९१ हजार ३६६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात


राजापूर : राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून एकूण ९१ हजार ३६६ रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
राजापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक २४४/२०२६, दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी ४१ हजार ३६६ रुपये किमतीचा प्रोव्हिजनल मुद्देमाल तसेच ५० हजार रुपये किमतीचे चार भ्रमणध्वनी संच असा एकूण ९१ हजार ३६६ रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या कारवाईत एकूण तीन आरोपींचा समावेश असून, प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे करीत आहेत.
राजापूर पोलिसांकडून ऑल आऊट ऑपरेशनच्या माध्यमातून अवैध दारूविक्री तसेच दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button