
भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी पारंपरिक दहीहंडी उत्साहात
बालगोपाळांचा उत्साह, गोविंदा गीतांवर फेर धरून नृत्य; आमदार भास्कर जाधवही झाले सहभागी
चिपळूण : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण शहरातील पाग येथील निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात बालगोपाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवामुळे परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी आमदार भास्कर जाधव हेदेखील उत्सवात सहभागी झाले. गोविंदा गीतांच्या तालावर फेर धरून नृत्य करत त्यांनी बालगोपाळांसोबत उत्सवाचा आनंद घेतला. बालगोपाळांच्या उत्साहाने आणि गोविंदा गीतांच्या तालावर रंगलेल्या नृत्यामुळे उपस्थितांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला.
पारंपरिक दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने पाग परिसर भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणाने दुमदुमून गेला. बालगोपाळांसह नागरिकांनी या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.




