बाल वैज्ञानिक स्पृहा भावेचे सुवर्णयश; गोकुळाष्टमी उत्सवात विशेष सत्कार


राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते उपेंद्र लिमये यांनी केले खास कौतुक


रत्नागिरी : रत्नागिरीतील कु. स्पृहा तेजराज भावे हिने बाल वैज्ञानिक म्हणून राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त लिमये कुल विश्वस्त ट्रस्ट तसेच लक्ष्मी केशव देवस्थान ट्रस्टच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रख्यात सिने अभिनेते श्री. उपेंद्र लिमये यांनी कु. स्पृहा भावे हिचे विशेष कौतुक करून तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त श्री. नरेश लिमये यांच्या हस्ते कु. स्पृहा हिचा सत्कार करण्यात आला. राज्यस्तरावर सुवर्णपदक मिळवत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या स्पृहाच्या या यशाबद्दल उपस्थितांनी तिचे अभिनंदन केले.

बालवयातच विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय सुवर्णपदकावर आपले नाव कोरणाऱ्या कु. स्पृहा तेजराज भावे हिच्या यशामुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील प्रतिभेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button