
स्थानिक भरतीत स्थानिकांचा हक्क डावलला तर कोकणात उद्रेक; राजन देसाईं
राज्यातील सुरू असलेल्या शिक्षक भरतीत कोकणातील हजारो डी.एड. आणि बी.एड. बेरोजगार तरुणांच्या हक्काला प्राधान्य मिळाले पाहिजे. परजिल्ह्यातील उमेदवारांना कोकणात आणून स्थानिक तरुणांना डावलले तर यावेळी कोकणातून अन्यायाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजन देसाई यांनी दिला.
लांजा शहरातील हॉटेल एकदंत येथे शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोकणातील तरुणांवर रोजगाराच्या बाबतीत सातत्याने अन्याय होत असल्याचे देसाई यांनी सांगितले. स्थानिक उमेदवार पात्र असताना कोकणात उद्रेक; राजन देसाईंचा
लांजा : राज्यातील सुरू
असलेल्या शिक्षक भरतीत कोकणातील हजारो डी.एड. आणि बी.एड. बेरोजगार तरुणांच्या हक्काला प्राधान्य मिळाले पाहिजे. परजिल्ह्यातील उमेदवारांना कोकणात आणून स्थानिक तरुणांना डावलले तर यावेळी कोकणातून अन्यायाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजन देसाई यांनी दिला.
लांजा शहरातील हॉटेल एकदंत येथे शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोकणातील तरुणांवर रोजगाराच्या बाबतीत सातत्याने अन्याय होत असल्याचे देसाई यांनी सांगितले. स्थानिक उमेदवार पात्र असताना त्यांना डावलून परजिल्ह्यातील उमेदवारांची भरती केली जाणार असेल, तर कोकणातील बेरोजगार तरुणांनी काय करायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.




