चिपळूण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य, नगर परिषदेचे दुर्लक्ष


चिपळूण शहरातील विविध भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक आणि वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. मात्र, गंभीर परिस्थिती असतानाही चिपळूण नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, वाहनचालकांना खड्डे चुकवताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने रस्त्यावरून मार्ग काढणे अधिकच धोकादायक बनले आहे. करदात्या नागरिकांना खड्यांतूनच प्रवास का? नगर परिषदेकडून रस्ते दुरुस्तीवर खर्च केला जात असताना काही रस्त्यांची अवस्था पुन्हा काही दिवसांतच खराब होत असल्याने कामांच्या दर्जावरही प्रश्नचिन्न निर्माण झाले आहे. नागरिकांच्या पैशातून रस्त्यांसाठी खर्च होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button