
मंडणगड तालुक्यातील दहागाव येथे घरफोडी; ८ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला
मंडणगड तालुक्यातील दहागाव जाधववाडी येथे घराच्या बैडरूममधील कपाटाचे लॉक चावीन उघडून सुमारे ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे ६ तोळे (६० ग्रॅम) सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ५ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडली. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात २१ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजल्यापासून ७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत फिर्यादी रवींद्र विष्णू जाधव (वय ४५, रा. दहागाव-जाधववाडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांच्या घरात ही चोरी झाली. फिर्यादी यांच्या घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटाचे लॉक चावीच्या साहाय्याने उघडून कपाटातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये ६ तोळे (६० ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे किंमत ८ लाख ४० हजार रुपये, यांचा समावेश आहे. या प्रकरणी फिर्यादी रवींद्र विष्णू जाधव यांच्या तक्रारीवरून पवन संभाजी सुतार (वय २७, रा. चांदेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडणगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून चोरीस गेलेले दागिने व घटनेमागील इतर बाबींचा तपास सुरू आहे.




