
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मार्लेश्वरच्या वाटेवर खड्ड्यांचे विघ्न
देवरूख राज्यातील लाखो ’भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू श्री क्षेत्र मालश्वरकडे जाणार्या देवरूख-मार्लेश्वर मार्गाची मुसळधार पावसामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. त्यातच या माजावरून सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, स्थानिक नागरिक, वाहनचालक तसेच मार्लेश्वर दर्शनासाठी येणार्या भाविकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
सध्या श्रावण महिना सुरू असल्याने मार्लेश्वर तीर्थक्षेत्री दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक आणि पर्यटक मार्लेश्वरला येत असताना त्यांना खराब रस्त्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राकडे जाणार्या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.




