
नापत्ता व्यक्तींविषयी पोलिसांचे आवाहन

रत्नागिरी, दि. २० ): रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून नापत्ता झालेल्या सहा व्यक्तींचा शोध सुरू असून, त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पंकज प्रकाश जोशी (वय २५), रा. आगवे जोशीवाडी, ता. लांजा, हे दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजता आगवे जोशीवाडी येथून नापत्ता झाले आहेत. त्यांची उंची ५ फूट, रंग सावळा, बांधा बारीक असून केस काळे आहेत. त्यांनी राखाडी रंगाचा फुलांच्या डिझाइनचा फुल शर्ट, निळ्या रंगाची ढोपरावर फाटलेली जिन्स पॅन्ट व काळ्या रंगाची चप्पल परिधान केली होती. त्यांच्या डाव्या हातात पंचरंगी दोरा आहे. भुवई व ओठांवर तसेच उजव्या पायाच्या गुडघ्याखाली जुन्या जखमेच्या खुणा आहेत.
विनायक दत्तात्रय अमरे (वय ३३), मूळ रा. बळेकरवाडी, कामळी लोगवान, खंडाळा, जयगड, सध्या रा. जनार्दन अपार्टमेंट, मारुती मंदिर, रत्नागिरी, हे दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर येथील आशिर्वाद कॉम्प्लेक्समधून नापत्ता झाले आहेत. त्यांची उंची ५ फूट २ इंच, बांधा मध्यम, रंग सावळा असून डोक्याच्या पुढील भागास टक्कल आहे. त्यांनी निळ्या रंगाचा फुल शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट व काळ्या रंगाचे सॅन्डल परिधान केले होते.

हलिमा महमद झांजु (वय ७५), रा. केळशी मोहल्ला, ता. दापोली, या दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२.१० वाजेपर्यंतच्या कालावधीत मंडणगड तालुक्यातील घुमरी येथून नापत्ता झाल्या आहेत. त्यांची उंची ४ फूट ५ इंच, बांधा मध्यम, रंग निमगोरा असून केस काळे-पांढरे व डोळे काळे आहेत. त्या साडी परिधान करतात.
जयेश जयराम नाक्ती (वय ३४), रा. पन्हाळी खुर्द, ता. मंडणगड, हे दि. १४ मार्च २०२१ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पन्हाळी खुर्द येथील राहत्या घरातून नापत्ता झाले आहेत. त्यांची उंची सव्वा ५ फूट, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहरा उभट, केस काळे, नाक सरळ व डोळे काळे आहेत. त्यांनी शेवाळी रंगाचा हाफ टी-शर्ट, फिकट काळ्या रंगाची हाफ पॅन्ट व चप्पल परिधान केली होती. संपर्क क्रमांक : ९२२१२३९०१७.
राजेश राजाराम साळवी (वय ८०), रा. वाकवली, ता. मंडणगड, हे दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास वाकवली येथील राहत्या घरातून नापत्ता झाले आहेत. त्यांची उंची ५ फूट ५ इंच, रंग निमगोरा, चेहरा उभट असून केस पांढरे आहेत. त्यांनी पोपटी रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. त्यांची स्मरणशक्ती कमी झालेली आहे.
पांडुरंग रावजी खांबे (वय ८५), रा. घुमरी, ता. मंडणगड, हे दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घुमरी बौद्धवाडी येथून नापत्ता झाले आहेत. त्यांची उंची साडेचार फूट, रंग गोरा, केस काळे-पांढरे आहेत. त्यांनी लाल रंगाचा हाफ टी-शर्ट, खाकी रंगाची हाफ पॅन्ट व चप्पल परिधान केली होती. त्यांच्या हातात लाकडी काठी असून त्यांच्याकडे पान-सुपारीचा बटवा असतो.
वरीलपैकी कोणत्याही नापत्ता व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
000




