
कर्जमाफी व वीजबिल माफीमुळे शेतकर्यांना मोठा दिलासा -आ. प्रमोद जठार
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी आणि वीजबिल थकबाकी माफीबाबत मोठी घोषणा केली असून, यामुळे राज्यातील लाखो शेतकर्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकर्यांच्या व जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन पूर्णत्वास नेणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुधवारी वाढदिवस असल्याने रत्नागिरी जिल्हा भाजपतर्फे त्यांना शुभेच्छा देत असून जिल्ह्यात भाजपतर्फे प्रत्येक मंडलमध्ये रक्तदान शिबिरे घेऊन किमान दोन हजार रक्ताच्या पिशव्या जमा करण्याचा संकल्प आम्ही सोडला असल्याची माहिती आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चिपळूण मार्कंडी येथे भाजपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ. जठार यांच्यासह रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतिश मोरे, भाजपचे जि. प. गट नेते प्रमोद अधटराव, शहराध्यक्ष, न. प. भाजप गहनेता शशिकांत मोदी, महिला शहराध्यक्षा, नगरसेविका रसिका देवळेकर, उपनगराध्यक्षा रुपाली वाडेकर, युवा मोर्चा अध्यक्ष शुभम बिसे, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेवक अंजली कदम, नगरसेविका शितल रानडे, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, रत्नदिप देवळेकर, श्री. खड़कर आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.




