कडवई रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशलला थांबा मंजूर

खेड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडवई परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय झाला असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–रत्नागिरी गणपती स्पेशल (गाडी क्र. 01153/01154) ला कडवई रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
कडवई स्थानकावर गणपती स्पेशलला थांबा मिळावा, यासाठी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे’ फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
गणेशोत्सव काळात मुंबईसह विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. त्यामुळे कडवई परिसरातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गणपती स्पेशलला स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीला पाठिंबा देत आमदार शेखर निकम यांनीही कडवई रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशलला थांबा देण्याबाबत कोकण रेल्वेकडे पत्राद्वारे मागणी केली होती. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर थांबा मंजूर झाल्याने कडवई परिसरातील नागरिक, संगमेश्वर तालुक्यातील प्रवासी तसेच कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button