चिपळुणात भर दिवसा दोन सदनिका फोडल्या


चिपळुण शहरातील गोवळकोट रोडसह बायपास मार्गानजीकच्या दोन सदनिका भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना गुरुवारी घडली. यातील एका सदनिकेतून तब्बल ८ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. तर दुसर्‍या सदनिकेतून कोणताही ऐवज चोरीस गेलेला नाही. भर दिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबतची फिर्याद नगमा अबीदअली मुजावर (४०, गोवळकोट रोड) यांनी दिली आहे. ३० जुलै रोजी दुपारी १२.३० ते १.४० वाजण्याच्या सुमारास नगमा मुजावर राहत
असलेल्या सदनिकेच्या दरवाजाची कडी, कोयंडा कोणत्यातरी हत्याराने अज्ञात व्यक्तीने उचकटला. त्यानंतर दरवाजा उघडून त्याने आत प्रवेश करत बेडरुममधील कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, साखळी, हार, कर्णफुले, अंगठ्या असा असा तब्बल ८ लाख १८ हजाराचा ऐवज चोरून नेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button