
महावितरणच्या निविदेमधील फेरबदल, कंत्राटदारावर गुन्हा दाखल
महावितरणच्या निविदेमधील कामाचे नाव बदलून फेरफार करणार्या कंत्राटदारावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताई कन्स्ट्रक्शनचे मालक संतोष मनोहर फटे असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी महावितरणच्या अनुराधा सुरेशराव आंधनसरे (४५, रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) यांनी याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. संतोष फटे याने शांताई कन्स्ट्रक्शन नावाने निविदा भरली होती. संतोष याने यासाठी वापरलेल्या ५०० रुपयांच्या बंधपत्र पीडीएफमध्ये फेरफार करून कामाचे नाव बदलेले. तसेच त्याची प्रिंट काढून त्यावर नमूद निविदेचा मजकूर लिहून ते मिळविण्याचा व महावितरणची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली. त्यानुसार संतोष याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३६, ३४० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




