
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चाळमाळा जेटी परिसरात ४ कोटींचे ’अंबरग्रीस’ हस्तगत
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चाळमाळा जेटी परिसरात विशेष गस्तीदरम्यान ४ कोटी रुपयांचे व्हेल माशाच्या उलटीसदृश ’अंबरग्रीस’ हस्तगत करण्याची कारवाई रायगड पोलिसांनी केली. याप्रकरणी राहुल पंढरीनाथ हातणी या संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. रॅकेट असण्याच्या शक्यतेने पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे. चाळमाळा जेटीजवळ एक संशयास्पद दुचाकीस्वार पोलिसांच्या निदर्शनास आला. त्याची कसून चौकशी करत झाडाझडती घेत असताना दुचाकीच्या डिक्कीतील कापडी पिशवीत ४ किलो अंबरग्रीस आढळले.




