
आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांचा ५० वा वाढदिवस अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश साळवी, नगरसेवक विजय खेडेकर, रविदास विकास मंडळाचे तालुका अध्यक्ष प्रकाश खेडेकर, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आनंद आंबेकर जि.प. पतसंस्थेचे संचालक श्री. नरेंद्र चव्हाण, श्री. गमरे तसेच आरोग्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी डॉ. परशुराम निवेंडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आरोग्य क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य, कर्मचारी हितासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली. त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व सामाजिक कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रमात वाढदिवसानिमित्त केक कापून उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारण्यात आल्या. आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.




