चिपळुणातून तरुणाचे अपहरण


चिपळूण : तालुक्यातील तळसर
येथील विकास सिद्धार्थ जाधव (३३) याचे अपहरण झाल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शशिकांत शंकर कवडे (६०, अडरे) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिष्ठी नदीपात्रालगत पुलाच्या खालील बाजूस विकास जाधव याची काळ्या रंगाची सॅक, मोबाईल व इतर साहित्य आढळून आले. यावेळी शशिकांत कवडे तसेच इतर नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता तो कोठेही सापडला नाही. अखेर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने विकास याचे अपहरण केल्याची खात्री होताच या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button