घरफोडीत ५० हजारांचा मुद्देमाल लांबवला


रत्नागिरी शहरालगतच्या नाखरेकरचाळ येथे चोरट्यांनी बंद घर फोडून ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी विजय जगन्नाथ नाखरेकर (६३, रा. नाखरेकरचाळ रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नाखरेकर यांचे नाखरेकरचाळ येथील घर बंद असल्याचा चोरट्यांनी फायदा उठवत कुलुप उचकटून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील साहित्य चोरुन नेले. अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button