गोळप येथील फिनोलेक्स कॉटेजमध्ये घरफोडी, ९ लाखांचा ऐवज लंपास

चोरट्यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील गोळप येथील फिनोलेक्स कॉटेज परिसरात बंद घराचे कुलूप तोडून रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ९ लाख रुपयांचा ऐवज लांबविला.
चोरी झालेले घर हे मागील काही दिवसांपासून बंद होते. याच गोष्टीचा फायदा उठवत चोरट्यांनी रेकी करुन हे घर लक्ष्य केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घरफोडी करणारे चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत.
२६ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कड़ी कोयंडा उचकटून आतमध्ये घरात प्रवेश केला. तसेच कपाटातील रोख रक्कम आणि मौल्यवान दागिने असा एकूण ९ लाखाचा ऐवज लंपास करुन चोरटे पसार झाले मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती मिळताचं पुर्णगड पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button