हातखंबा येथे कुत्रा आडवा आल्याने रिक्षा पलटी; तिघे किरकोळ जखमी


रत्नागिरी, २८ जुलै : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा येथील आरटीओ कॅम्पसमोर मंगळवारी सकाळी रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकासह तीन जण किरकोळ जखमी झाले. रस्त्यावर अचानक कुत्रा आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अनुस्कुरा (ता. राजापूर) येथून रत्नागिरीकडे प्रवासी घेऊन येत असलेली रिक्षा (एमएच-०८-बीसी-१४८९) सफोन शकीब कॅप्टन हे चालवत होते. सकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास हातखंबा येथील आरटीओ कॅम्पसमोर अचानक एक कुत्रा रस्त्यावर आल्याने चालकाने रिक्षा वळवून अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात वाहनावरील ताबा सुटल्याने रिक्षा रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली.

या अपघातात चालक सफोन शकीब कॅप्टन यांच्यासह प्रवासी अफ्रिन तोडगी आणि निलोफर गुहागरकर हे किरकोळ जखमी झाले. घटनेनंतर श्री नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेद्वारे तिन्ही जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button