रत्नागिरी मेडिकल कॉलेजसाठी अत्याधुनिक स्किल लॅब मंजूर


रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी अत्याधुनिक पद्धतीने सराव करता यावा, यासाठी शासनाकडून स्किल लॅब मंजूर करण्यात आली आहे. वैद्यकीय
शिक्षण व आयुष आयुक्तालयामार्फत यामार्फत नुकताच यासंबंधीचा अधिकृत पुरवठा आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळे रत्नागिरीतील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाने २२ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, जालना येथील मेसर्स गस्टो फार्मा या कंपनीला या अत्याधुनिक स्किल लॅबच्या उभारणीचे कंत्राट देण्यात आले आहे. टर्न की तत्त्वावर ही लॅब उभारली जाणार असून, यासाठी प्रत्येक महाविद्यालयामागे ९ कोटी ४९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. रत्नागिरीसह राज्यातील नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही अशाच प्रकारच्या स्किल लॅब मंजूर करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button