सरकारला झुकवले, जल्लोष होणार तर होणार! शिवाजी पार्कच्या मोर्चाबाबत ठाकरे बंधूंची मोठी घोषणा


देशात अजून क्रांतीची ठिणगी विझलेली नाही. युवकांनी देशाला भयाच्या छायातून बाहेर काढण्याचे काम केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्या राजीनामा की खातेबदल करण्यात येणार हे सरकारकडून अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.त्यासोबतच सीजेपीच्या दोन मागण्या बाकी राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यामुळे रविवारी तरुणाईचे अभिनंदन करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली.दिल्लीतील सीजीपीचे आंदोलन करीत देशभरातील युवक मोठ्या प्रमाणांत रस्त्यावर उतरले होते. त्यांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखवले आहे. त्यामुळे या युवकाचे अभिनंदन करणे गरजेचे आहे. त्यासाठी रविवारी काढण्यात येणारा मोर्चा पूर्वी ठरल्या प्रमाणेच काढण्यात येणार असल्याचे मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. उद्या शिवाजी पार्कवरून तरुणाईचा विजय मोर्चा निघणार आहे. देशभरातील युवकांनी देशाला भयाच्या छायातून बाहेर काढले आहे.अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांचे अभिनंदन करतो. एका झुरळाने हुकूमशाहला जेरीस आणले आहे. सीजेपीच्या दोन मागण्या बाकी राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार आहे. अभिजित दिपके यांच्यासोबत चर्चा करून यतेय काळातील रणनीती ठरविणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button