पेपरफुटी-लाठीमार निषेधार्थ युवासेनेचा एल्गार, उद्या रत्नागिरी-चिपळूण येथे स्वाक्षरी अभियान

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी युवासेना आक्रमक

रत्नागिरी | नीटसह विविध स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला खेळ आणि आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेतर्फे स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार गुरुवार, 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयासमोर तर चिपळूण येथे डी बी जे कॉलेज समोर हे अभियान घेण्यात येणार आहे.

प्रमुख मागण्या:

  1. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
  2. पेपरफुटीविरोधी आंदोलनादरम्यान सोनमजी वांगचुक, अभिजित दिपके आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराची निष्पक्ष चौकशी व्हावी.
  3. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळल्याच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

यावेळी स्वाक्षरी अभियानाबरोबरच काळ्या फिती बांधून लाठीमाराचा निषेध करण्यात येणार आहे. तसेच देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी-युवा आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला जाणार आहे.

युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत म्हणाले, “पेपरफुटी करणाऱ्यांना संरक्षण आणि न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठ्या चालविणे हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. हा लढा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. आता शांत बसण्याची वेळ संपली आहे.”

या अभियानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, पालक आणि जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसाद सावंत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button