लोटेत उत्पादन बंद आदेश कागदावरच, ग्रामस्थांच्यात नाराजी


सोनगाव नाल्यात दुधाळ रासायनिक साडपाणी आढळल्यानंतर ग्रामस्थांनी लोटे पोलीस दूरक्षेत्रात धडक देत दोषी कंपनीवर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहा कंपन्यांना उत्पादन तातडीने बंद करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. तसेच नाला आणि कंपन्यांमधील सांडपाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहितीही देण्यात आली होती. मात्र नोटीस बजावूनही संबंधित कंपन्यामध्ये उत्पादन सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंडळाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली का, याबाबतच प्रश्न निर्माण झाला आहे. जर उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले होते, तर उद्योग सुरू कसे राहिले? आणि आदेशाचे पालन न करणार्‍या कंपन्यांवर तात्काळ कारवाई का करण्यात आली नाही, अशी विचारणा ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button