राजापूरला १९ कोटींचा निधी नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांनी मानले आभार


शासनाच्या नगर विकास विभागाकडून शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी न. प. फंड अंतर्गत नगर परिषदेला विविध महत्वपूर्ण विकास कामांसाठी १९ कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांसह सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांसह पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत.
सोमवारी पत्रकार परिषदेत खलिफे यांनी याबाबत माहिती दिली. शहरातील पाच महत्वपूर्ण कामांना निधी मंजूर झाल्याने शहराच्या विकासाला नक्कीच न्याय मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार ण परिषदेला उपनगराध्यक्ष विनय ही गुरव, सौरभ खडपे, ऍड. जमीर खलिफे, ऍड. राहुल तांबे उपस्थित होते.
नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची मागणी स्वीकृत नगरसेवक महेश शिवलकर यांनी आमदार सामंत यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत अवघ्या दोन महिन्यातच वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत जलशुद्धी केंद्र व पाणीपुरवठा योजनेकरिता ५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button