
शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ,जामीन अर्जावर मुख्य सुनावणी २३ जुलै रोजी होणार
शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांची सून गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी विनायक राऊत यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, या अर्जावर मुख्य सुनावणी २३ जुलै रोजी होणार असून, तोपर्यंत न्यायालयाने राऊत यांना कोणतेही अंतरिम संरक्षण दिलेले नाही.
न्यायालयाने तात्काळ दिलासा नाकारल्यामुळे पोलीस चौकशीसाठी विनायक राऊत यांना २३ तारखेच्या आधी कधीही ताब्यात घेऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे. न्यायालयाने अंतरिम संरक्षण नाकारल्याने २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे




