राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथील डॉक्टरकडे खंडणी प्रकरणी लांजातील दोघे ताब्यात


राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथील डॉक्टरकडून २५ हजार रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी लांजातील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू आहे. त्यांनी गुगल पेद्वारे उकळलेले २५ हजार रुपये त्या डॉक्टरला परत मिळवून देण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे.
या प्रकरणी डॉक्टरने ७ पाठविलेल्या फोटोंचा आधार घेत खंडणीची मागणी करत त्या डॉक्टरला ब्लॅकमेल केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सिद्धेश जयंत आंब्रे (३१, सडवली मावळतवाडी ता. लांजा) व सोहम गंगाराम विर्हाडी (२०, खांचलवाडी गोळवशी, ता. लांजा) या दोन संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी त्या डॉक्टरने राजापूर पोलीस ठाण्यात मेमध्ये तक्रार दिली होती. तक्रारदार डॉक्टर यांच्या मोबाईल इन्स्टाग्राम आयडी वापरत होते. संशयित आंग्रे यांनी डॉक्टरांकडून एकूण २ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली होती. यातील गुगल पेवर २५ हजार रुपये रक्कम स्वीकारली आहे. पोलीस निरीक्षक अमित यादव यानी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button