सेवा संकल्प अभियाना’त रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; ३३ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

‘
रत्नागिरी, दि. १८ ) : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या महिनाभराच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत विविध आरोग्य शिबिरांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यात एकूण ९०७ शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून, तब्बल ३३ हजार ३३५ लाभार्थ्यांनी याचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे आणि असंसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान करण्याच्या उद्देशाने हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. यामध्ये सर्वाधिक भर असंसर्गजन्य रोग (NCD) तपासणीवर देण्यात आला होता.
आयोजित शिबिरांचा तपशील :

  • NCD (असंसर्गजन्य रोग) तपासणी शिबिरे : ७७७
  • योगा व ध्यान सत्रे : १२७
  • रक्तदान शिबिरे : ३
  • एकूण शिबिरे : ९०७
  • एकूण लाभार्थी : ३३,३३५
    अभियानादरम्यान रक्तदाब, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांच्या तपासणीसोबतच नागरिकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी १२७ ठिकाणी योगा व ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सामाजिक बांधिलकी जपत ३ रक्तदान शिबिरेही यशस्वीरीत्या पार पडली.
    आरोग्य विभागाच्या या नियोजनबद्ध उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो नागरिकांना त्यांच्या घराच्या नजीक मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाचा थेट लाभ मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button