दापोलीवासीयांना संस्कृत संभाषण शिकण्याची संधी: २१ ऑक्टोबरपासून संस्कृत संभाषण शिबिरांचे आयोजन


दापोली ):

संस्कृत भाषा म्हटली की क्लिष्ट व्याकरण, मंत्र किंवा कठीण श्लोक असं चित्र मनात उभं राहतं. “आम्ही कधी संस्कृत शिकलो नाही” किंवा “शाळेनंतर आता या वयात संस्कृत कसं शिकणार?” असा विचार अनेकजण करतात. मात्र, ही सर्व भीती बाजूला ठेवून जसे आपण मराठीत सहज संभाषण करतो, तसेच दैनंदिन व्यवहारातील संस्कृत संभाषण शिकण्याची सुवर्णसंधी आता दापोलीकरांसाठी उपलब्ध झाली आहे.

संस्कृतभारती, कोंकणप्रांत उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने दापोली तालुक्यात २१ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत निःशुल्क संस्कृत संभाषण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराची अनोखी वैशिष्ट्ये: पहिल्याच दिवसापासून संस्कृत संवाद, शिबिरात शिक्षक आणि सहभागी सर्वजण पहिल्या दिवसापासून थेट संस्कृतमध्येच संवाद साधतात.
वही नाही, पेन नाही! केवळ हसत-खेळत संस्कृत संभाषण! या शिबिरांना उपस्थित राहण्यासाठी संस्कृतचे कोणतेही पूर्वज्ञान आवश्यक नाही.
वयोमर्यादा: १५ वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिक (विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी व ज्येष्ठ नागरिक) सहभागी होऊ शकतात.

दापोली तालुक्यातील शिबिरांचे ठिकाण व वेळ:
नागरिकांच्या सोयीसाठी दापोलीत सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेगवेगळ्या सत्रांत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे:

१. सकाळचे शिबिर:
वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० (प्रतिदिन २ तास)
ठिकाण: धन्वंतरी सभागृह, श्रीराम बलवर्धक मंडळ, जालगाव, दापोली.
संपर्क: 9421076966

२. संध्याकाळचे शिबिर:
वेळ: सायंकाळी ५:०० ते रात्री ७:०० (प्रतिदिन २ तास)
ठिकाण: आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी विद्यामंदिर, दापोली.
संपर्क: 7263910234

नावनोंदणी कशी कराल?
हे शिबिर पूर्णपणे निःशुल्क आहे. आपल्या सोयीची वेळ निवडा व वरील संपर्क क्रमांकावर फोन करून नावनोंदणी करावी.

या दोन्ही शिबिरांना अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्कृत भारती उत्तररत्नागिरी जिल्ह्याद्वारे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button